सणासुदीच्या ऑर्डर्स सुरू — अनारसे पीठ : २ किलोवर ½ किलो फ्री

98234 86476

पुणे · महिला गृह उद्योग

फक्त पारंपरिक पद्धत नाही, तर पारंपरिक हात सुद्धा.

अनारसे, कुरडई, चकली, खजूर लाडू — पुण्यातल्या आमच्या स्वयंपाकघरात, घरी करतो तसेच, थोड्या थोड्या प्रमाणात बनवलेले.

१००% शाकाहारी · FSSAI नोंदणीकृत · ऑर्डरप्रमाणे ताजे

ताजे अनारसे
साबुदाणा बटाटा चकली
अनारसे — अधिक मास आणि गौरी-गणपतीसाठी

आमचे पदार्थ

भाव प्रमाण व हंगामानुसार बदलतो. पदार्थ यादीत जोडा — भाव आम्ही WhatsApp वर कळवू.

ऑफर

अनारसे पीठ — २ किलोवर ½ किलो फ्री

पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पीठ. घरीच थापा, तळा आणि ताजे जाळीदार अनारसे वाढा.

सणवार

प्रत्येक सणाचं आपलं ताट असतं. कोणत्या सणाला काय मागवतात, ते हे.

अधिक मास

जावयाचं धोंडा वाण

“अधिक मास म्हणजे लाडक्या जावयाला अनारसे हे आलेच!” वाणासाठी तयार अनारसे.

अनारसे →

भाद्रपद

गौरी-गणपती

गौरींच्या नैवेद्यासाठी अनारसे — तयार, किंवा घरी ताजे तळण्यासाठी पीठ.

तयार पीठ →

आषाढी · नवरात्र · शिवरात्र

उपवास

साबुदाणा बटाटा चकली — उपवास म्हणजे दरवेळी तीच खिचडी, असं नाही.

उपवासाचे पदार्थ →

आश्विन – कार्तिक

दिवाळी फराळ

चकली, अनारसे, लाडू — फराळाची पूर्ण यादी एकाच मेसेजमध्ये पाठवा.

यादी बनवा →
अनारश्याचं पीठ — हातानेच तयार होताना.

घरचं स्वयंपाकघर, घरचीच पद्धत.

श्री रुक्मिणी महिला गृह उद्योग पुण्यातल्या महिला चालवतात. प्रत्येक पदार्थ हाताने मळून, थापून आणि तळून, थोड्या प्रमाणात बनवला जातो — कारखाना नाही, शॉर्टकट नाही. महाराष्ट्रातल्या घराघरांत जसं वर्षानुवर्षं बनतं, तसंच — आणि तुमच्या ऑर्डरप्रमाणे ताजं.

ऑर्डर कशी द्यायची?

  1. १पदार्थ निवडून यादीत जोडा
  2. २यादी WhatsApp वर पाठवा
  3. ३आम्ही भाव, तारीख व डिलिव्हरी कळवतो

ऑर्डरसाठी फोन करा

WhatsApp वर मेसेज करा